एरंडोल परिसरात खरीप पेरण्यांना वेग

0

एरंडोल (प्रतिनिधी);- एरंडोल परिसरात मंगळवारी रात्री बऱ्यापैकी मृगाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. याआधी सुद्धा पाऊस झाल्यामुळे तीन ते चार वेळा दमदार पाऊस झाल्यामुळे जमिनीची ओल वाढले आहे म्हणून बुधवारपासून एरंडोल परिसरात खरीप पेढ्यांच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे आतापर्यंत तालुक्यात पावसाने शंभरी ओलांडली आहे एकूण १०१.१ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री रिंगणगाव ११, कासोदा ०२, उत्राण ०७, व एरंडोल २१ मिलिमीटर मृगाच्या सरी बरसल्या आहेत.

पेरणी अहवालानुसार आतापर्यंत १३ हजार ४१३ हेक्टर वर कपाशीची लागवड झाली आहे. बागायती व कोरडवाहू हे दोन्ही प्रकारचे कापूस लागवड ६० ते ७० % पर्यंत पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी दिली आहे.

ज्वारी १९७ हेक्टर, मका १८९८ हेक्टर, तृणधान्य २१२३ हेक्टर, कडधान्य ७४८ हेक्टर, सोयाबीन ११४० हेक्टर याप्रमाणे लागवड झाल्याची माहिती पेरणी अहवालात नमूद करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.