सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे दर

0

नवी दिल्ली : पेट्रोल – डिझेलच्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोल ११ पैसे आणि डिझेल १० पैस प्रती लीटर महागलं असून येणाऱ्या काही दिवसांत पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी (आज) या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं.

शनिवारी मुंबईत पेट्रोल ७५.९७ रुपये तर डीझेल ६७.२२ रुपये प्रती लीटरवर पोहचलेलं पाहायला मिळतंय. तर दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७०.२८ रुपये आणि डिझेलची किंमत ६४.११ रुपये आहे.  कोलकातमध्ये पेट्रोल ७२.५४ रुपये तर डिझेल ६६.०३ रुपये, चेन्नईत पेट्रोल ७३.०१ रुपये तर डिझेल ६७.८१ रुपये, नोएडामध्ये पेट्रोल ७०.२१ रुपये आणि डिझेल ६३.५६ रुपये प्रति लीटरवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.