भुसावळात रविवारी भाजप तालुका व शहरची संयुक्त बैठक

0

भुसावळ :- भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर आणी ग्रामीण ची संयुक्त बैठकीचे उद्या 30 जून रविवार रोजी संध्याकाळी 05 वाजता ” स्टार लाॅन राजवाडा , वाजोळा रोड , भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष डॉ.संजिव पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डाॅ.सुनिल नेवे, जिल्हा सरचिटणीस रोहीणीताई खेवलकर, हर्षल पाटील व रावेर लोकसभा मतदारसंघ विस्तारक हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अध्यक्ष ,सरचिटणीस ,कार्यकरीणीस सदस्य , विविध मोर्चा -आघाडी, युवा मोर्चा, महिला आघाडी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आघाडी, जिप.पंचायत समिती सदस्य.भाजपा जिल्हा पदाधिकारी. विस्तारक.बूथ प्रमुख शक्ती केन्द्र प्रमुख, आमदार व खासदार सक्रिय कार्यकर्ते उपस्थित म्हणून अपेक्षित आहे. तरी आपण उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे व शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे व पवन बुंदेले व ग्रामीण तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील व नारायण तायडे यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.