सर्जा राजाच्या खांद्यावर शेती मशागतीचा धुरा

0

जळगाव

शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. यामुळे मशागतीसाठी बैलजोड्यांची मागणी वाढली आहे. मात्र जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप जनावरांच्या बाजारांना परवानगी दिली नाही. लोक प्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.

सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिपाची पेरणीची लगबग सुरू आहे पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात बैलजोड्यांची गरज भासत आहे. मात्र करोनाच्या

पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठी पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांबरोबर आठवडी बाजारात चालणारे मोठे अर्थकारणही प्रभावित झाले आहे. जनावरांचा व्यापार करणारे व्यापारी जनावरांच्या बाजारात चालणारी दुकाने, लहान हॉटेल त्याचबरोबर जनावरांची वाहतूक करणारे वाहनधारक या सर्वांना या बाजार बंदचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

जनावरांचे बाजार बंद पेरणीसाठी वखरणी,कोळपणी बैल व दुधासाठी काय मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.