एरंडोल तैलिक महासभा शाखेतर्फे अन्यायाविरूध्द संघर्ष करण्याचा इशारा

0

प्रतिनिधी – एरंडोल 

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजावर झालेला मोठा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी संघर्ष करण्याचा इशारा एरंडोल तैलिक महासभा शाखेतर्फे तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांना शुक्रवारी देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

एरंडोल तैलिक महासभा शाखेतर्फे माजी नगराध्यक्ष राजेंद्र दोधू चौधरी व जळगाव जिल्हा प्रांतिक तैलिक महासभेचे युवा कार्याध्यक्ष आनंदा चौधरी उर्फ भगत यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, अनिल चौधरी, गांधीपुरा तिळवण तेली समाजाचे उपाध्यक्ष दशरथ चौधरी, प्रांतीक तैलिक महासभेचे जिल्हा सचिव सुनिल चौधरी, कासोदा दरवाजा तेली समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिध्द उद्योजक अनिल जगन्नाथ चौधरी, भिका चौधरी, गुलाब चौधरी, कृष्णा चौधरी, नितीन चौधरी, दिपक चौधरी, पत्रकार शैलेश चौधरी, अमोल चौधरी आदी समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सुप्रिम कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करवुन राज्यात २७टक्के ओबीसींचे आरक्षण पूर्ववत लागू करावे,सुप्रिम कोर्टात अपिल करून होऊ घातलेल्या पोटनिवडणुका रद्द कराव्यात,राज्य व केंद्र शासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारसी लागू कराव्यात, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी व ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात टक्केवारी नुसार त्यांना प्रत्येक क्षेञात आरक्षण देण्यात यावे,राज्य व केंद्र सरकार ने जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा.या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी करावी अन्यथा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या माध्यमातून ओबीसी समाज रस्त्यावर येऊन तिव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.