नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे – अ भा बंजारा सेना

0

पारोळा

हरित क्रांतीचे जनक आधुनिक महाराष्ट्राचे  शिल्पकार.कृषी औद्योगिक  क्रांतीचे जनक तथा नवी मुंबईचे शिल्पकार महानायक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांनी केली आहे. पारोळा नायब तहसीलदार शिंदे साहेब यांना १जुलै रोजी निवेदन देण्यात आले.

वसंतराव नाईक यांचे  कर्तुत्व राज्यासह देशाला गौरवान्वित  करणारे आहेत. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करिता असताना त्यांनी मोठी दुरदृष्टीने मुंबई उभारली.तत्कलिन विरोधी पक्षांनी नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध‌ दर्शविला होता.परंतु दुरदृष्टी असणारे विकासाचे महानायक वसंतराव नाईक यांनी नवी मुंबई उभारली. हे सर्वश्रृत असताना त्यांच्या या अद्वितीय कार्याचा सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक साहेबांचे नाव‌ देणे समर्पक ठरेल.

आधुनिक महाराष्ट्राला घडविणाऱ्या नाईक साहेबांच्या सन्मानार्थ भरिव‌ व‌ ऐतिहासिक  असे आज वर काहीही दिसुन आले नाही. वसंतराव‌ नाईक जन्म शताब्दी वर्ष अंतर्गत देखिल अनेक बाबी अजुन ही प्रलंबीत आहे. हे अतिशय खेदाने म्हणता येईल. नाईक साहेबांच्या अनुयायात  बंजारा समाजात या विषयी प्रचंड अस्वस्थता आहे.  १ जुलै कृषी दिन (वसंतराव नाईक जयंती) या पावन पर्वावर नाईक साहेबांच्या नावाने विषेश घोषणा व‌ निर्णय होतील अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांनी केले आहे.

या प्रसंगी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय प्रचारक प्रा.सुभाष पवार,  दगडु जी महाराज,  बंजारा युवा सेना पारोळा तालुका उपाध्यक्ष प्रेम पवार. तालुका महासचिव सुनिल पवार,  अरुण जाधव,  जितेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.