सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याचा तपास राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय करणार

0

जळगाव :  जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (वय 35, रा. सुपारीबाग, जामनेर) यांचा खून खटला, सदर गुन्ह्याचा तपास व निकाल यावर राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग मुंबई संशोधन करणार आहे. हे संशोधन एलएलएमच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी यावर पीएचडी करणार आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सरकारी वकील रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांचा १३ जानेवारी रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. या गुन्ह्याचा खून खटल्याचा निकाल १३ मे २०२१ रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने दिला. यात मयत ऍड. रेखा राजपूत यांचे पती डॉ. भरत लालसिंग पाटील याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप तर व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) याला कलम २०१ अन्वये न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे.

कुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतांना हा गुन्हा पोलिसांसाठी आव्हान होता. तसेच मयत सरकारी वकील असल्याने या गुन्ह्याची राज्यभरात चर्चा झाली होती. यात पोलीस, डॉक्टर व वकील या तीन्ही यंत्रणांनी यात झोकून काम केले.आणि संशयितांना शिक्षा झाली.

जिल्हा न्यायालयाकडून हा निकाल संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतर या खटला व निकाल, गुन्हा व त्याचा तपास याची मुंबई येथील राष्ट्रीय फौजदारी येथील न्याय विभागाने संशोधनासाठी निवड केली. त्यावर राष्ट्रीय फौजदारी न्याय विभागाच्या विद्यापीठाअंतर्गत एल.एल.एमच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणारे विद्यार्थी पीएचडी करणार आहेत.

त्याबाबत मुंबई येथील राष्ट्रीय फौजदारी येथील न्याय विभागाने कळविले आहे. जिल्हा पोलीस दलासह या खटल्या, गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍यांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.