कोरपावली येथील जावाई सुरक्षा बलाचे जवान शहीद गनी पटेल अनंतात विलन

0

यावल (शब्बीर खान) : धुळे जिल्ह्यतील चिंचवार गावचे सुपुत्र आणि जळगाव जिल्ह्यातील  कोरपावली ता यावल येथिल  गावचे जावाई आणि केंद्रीय सुरक्षा बलातील जवान( CISF ) शहीद गणी पटेल यांच्या पार्थिवावर धुळे येथील चाळीसगाव रोड वरील मोमीन कब्रस्थान येथे शासकीय इंतमात अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सुरक्षबालातर्फे आणि धुळे जिल्हा पोलिसदला तर्फे 5 राऊंड हवेत फायरिंग करून मानवंदना देण्यात आली यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील, धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शेख, माजी आमदार शरद पाटील नगरसेवक शाबीर सेठ, जळगाव जिल्हा काँग्रेस फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष आणि शहीद गणी पटेल यांचे शालक जलीलभाई पटेल शहिद गणी पटेल यांचे मोठे बंधू चिंचवारचे सरपंच रहीम पटेल, शहीद पटेल यांचा परिवार पत्नी मीना पटेल, मुलगा रईस पटेल, मुलगी शबनम पटेल, जावाई राहील पटेल सहित विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नातेवाईक मित्र परिवार  मोठ्या संख्येने त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले होते

Leave A Reply

Your email address will not be published.