सपाचे नेते मुलायम सिंह रुग्णालयात

0

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे नेते तसेच मैनपुरीचे उमेदवार मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी अचानक लखनऊच्या संजय गांधी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. नियमित तपासणी सोबत मुलायम सिंह यांना अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या टीमने त्यांचा मधुमेह देखील तपासला.

पीजीआयचे राकेश कपूर, प्रोफेसर अमित अग्रवाल, सुशील गुप्ता, डॉक्टर अभय वर्मा यांच्या टीमने त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. पीजीआयने दिलेल्या आरोग्य अहवालानुसार मुलायम सिंह हे नियमित तपासासाठी आले होते. मुलायम सिंह यांना पूर्ण तपासणी झाल्यानंतर सोडण्यात येणार आहे. शारिरीक अस्वस्थ्यामुळे ते मैनपुरी येथील सभेला संबोधित करु शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.