ऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी ; मायावती अडचणीत

0

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखाने विक्री प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याप्रकरणी केन्द्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर बसपच्या प्रमुख मायावती यांच्या अडचणीत भर पडलीय.

मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री असताना २०११ – १२ मध्ये  साखर कारखान्यांच्या विक्रीत बाजारदरापेक्षा कमी किंमतीत विकल्याने सरकारी तिजोरीचे तब्बल 1 हजार 179 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. सीबीआयनं कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी एक प्राथमिक तक्रार नोंदवलीय तसंच सहा प्रारंभिक चौकशी सुरू केलीय. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं गेल्या वर्षी १२ एप्रिल रोजी या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तब्बल वर्षभरानंतर सीबीआयला या चौकशीसाठी सवड मिळालीय.

साखर घोटाळ्याच्या चौकशीत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याला अथवा मंत्र्याला आरोपी बनवण्यात आलं नसल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. परंतु, उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ लिमिटेडचे कारखाने खरेदी करण्यासाठी खोटी कागदपत्रं जमा करणाऱ्या सात जणांविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.