श्री शिवाजी हायस्कूल येथे दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप

0

पारोळा—प्रतिनिधी

येथील श्री शिवाजी हायस्कूल च्या दहावी च्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला.अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक जे .बी .पाटील ,वाय. टी. पाटील , के. ए .निकम , एम .वाय .लिंगायत , आर .एस .पाटील , पी .एन .पाटील , प्राजक्ता भामरे , बी . व्ही. पाटील ,आदी जण उपस्थित होते या वेळी विद्यार्थ्यांना गतकाळातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला

रोशनी पाटील हिने  शाळेत मिळालेल्या संस्काराची शिदोरी घेऊन जीवनात ते संस्कार आमलात आणू असे सांगितले आम्रपाली वानखेडे हिने गेल्या ६ वर्षात विद्यार्थी जीवनातील अनेक गोड कडू आठवणी आत्मसात केल्याचे सांगितले या वेळी शिक्षकांनी परीक्षेला जाता जाता यावर मार्गदर्शन केले

या वेळी आर एस पाटील ,पी एन पाटील , जे बी पाटील एम वाय लिंगायत वाय टी पाटील रावसाहेब भोसले आदींनी विद्यार्थ्यांनी अति मोबाईल चा वापर करू नये चुकीच्या गोष्टींकडे वळू नये परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी गैरमार्गाचा वापर करू नका असे आहवान या वेळी केले

मुख्याध्यापक अरुण पवार यांनी सर्वच विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत येऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली या वेळी विद्यार्थ्यांना शाळेकडून स्नेहभोजन देण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रावसाहेब भोसले यांनी मानलेत यशस्वीतेसाठी वाय के पाटील प्रसाद नावरकर ,संदीप बोरसे ,शांताराम चौधरी , पुंजाराम सोनवणे ,भूषण चौधरी आदींनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.