धर्माबाद येथे स्काऊट गाईड विभागाला भेट

0

स्काऊट गाईडच्या गुणवत्तावाढीसाठी शाळा भेटी

धर्माबाद ( प्रतिनिधी )
धर्माबाद येथील शाळेना लॉर्ड बेडन पावेल त्यांच्या जयंतीनिमित्य नांदेड भारत स्काऊट गाईड कार्यालया तर्फे युनिटला भेटी देण्यात आल्या यावेळी सर्व प्रथम हुतात्मा पानसरे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व तेथील मुख्याध्यापक गंगाधर पवार आणि गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एस. कदम यांनी स्काऊट संघटक व सचिव त्यांचा यथोचित सत्कार केला.

स्काऊट गाईड युनिटच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांमध्ये राज्य पुरस्कार ,राष्ट्रपती पुरस्कार चतुर्थ चरण, हीरक पंख, पंतप्रधा ढाल स्पर्धा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून युनिटची गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी सर्व स्काऊटर गाईडर यांनी प्रयत्न करावे असे आव्हान करण्यात आले.

यावेळी हुतात्मा पानसरे,प्राथमिक व हायस्कूल, धर्माबाद. जिजामाता कन्या मा.उच्च मा. शाळा, धर्माबाद. साईबाबा प्राथमिक शाळा धर्माबाद, ऊर्दू प्राथमिक व हायस्कूल धर्माबाद, गुरुकुल विद्यालय धर्माबाद ,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धर्माबाद. ग्रीन फिल्ड नॅशनल स्कूल, धर्माबाद. इत्यादी शाळांना भेटी देण्यात आल्या यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व स्काऊटर ,गाईडर व स्काऊट गाईड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.