श्री. गो.से. हायस्कूल येथे शिक्षकांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध

0

पाचोरा ✒ प्रतिनिधी

मुंबई येथे विनाअनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षक संघटनांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी केले. यांनी  दि. 27 ऑगस्ट 2019 रोजी काळ्या फिती लावून कामकाज  केले.

शासनाने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच वरील सर्व शाळांना  त्वरित अनुदान मंजूर  करण्यात यावे अशी मागणी  करण्यात आली. पाचोरा तालुका टी.डी. एफ. संघटने तर्फे  सुद्धा या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील, पर्यवेक्षिका पी. पी. पाटील, पाचोरा तालुका टी. डी. एफ. संघटनेचे अध्यक्ष आर. एल. पाटील, सांस्कृतिक विभाग  प्रमुख पी.एम. वाघ, व्ही. एस. साळुंखे, सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.