एनआयएचे तामिळनाडूत पाच ठिकाणी छापे; संशयित सामग्री जप्त

0

चेन्नई :- तामिळनाडूमधील कोईंबतूर शहरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरूवारी तब्बल पाच ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये आतापर्यंत लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले. दरम्यान, कोणत्या कारणासाठी एनआयएने छापे टाकले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

काही दिवसांपूर्वी एनआयएने कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये इसिसशी प्रभावित असलेल्या एकाला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला मोहम्मद अझरूद्दीन हा श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी बॉम्बस्फोट करणाऱ्या झहरान हाशिमशी प्रभावित झाला होता. त्यानंतर एनआयने याप्रकरणी एक नवी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, केरळमध्ये असलेल्या इसिस मॉड्यूल्सचा श्रीलंकेतील हल्ल्यात सहभाग आहे किंवा नाही याच्या तपासात सुरक्षा यंत्रणा लागल्या आहेत. यापूर्वी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. तपासातून काही समोर आले नसले तरी इसिसशी निगडीत काही जणांनी श्रीलंकेतील दहशतवादी आदिलच्या काही फेसबुक पोस्ट शेअर केल्याचे समोर आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.