श्रीराम मंदिर भूमी पूजनाचे परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांना आमंत्रण

1

फैजपूर (प्रतिनिधी) : दि.५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजन होत असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह देशभरातील काही संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनाही श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र आयोध्या यांचेकडून आमंत्रण मिळाले आहे.

परमपूज्य महामंडलेश्वर या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला दि. २ ऑगस्ट रोजी जाणार आहे. तत्पूर्वी दि. १ ऑगस्टला ते चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमावर जाऊन या पवित्र नद्यांचे जल आणून विधीवत पूजन करणार आहे. आणि ते पवित्र जल घेऊन अयोध्याला प्रस्थान करणार आहे असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

1 Comment
  1. Mohan mahajan says

    Jai Shree Ram

Leave A Reply

Your email address will not be published.