श्रीक्षेत्र मेहूणला दि. 16 पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा

0

भुसावळ :  मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण येथील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथे देवस्थानचे माजी अध्यक्ष वैकुंठवासी गुरुवर्य बाबुराव महाराज मेहूणकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पंचदिन अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दि. 16 ते 20 डिसेंबर 2020 दरम्यान हा सोहळा होणार असून पहाटे काकडाआरती, सकाळी व दुपारी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरीकीर्तनाचा कार्यक्रम होईल. 16 रोजी भरत महाराज म्हैसवाडी, 17 रोजी ज्ञानदेव महाराज जांबुळधाबा, 18 रोजी मनोहरदेव महाराज अंतुर्ली,19 रोजी गोविंद महाराज चौधरी केकतनिंभोरा यांची कीर्तने होणार असून 20 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान ज्ञानेश्वर महाराज वाघ भैरवगड यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सप्ताहात विकास पाटील, मुरलीधर पाटील, भगवान पाटील, अंबादास बाठे, मीराबाई पाटील, सुरेश पाटील, प्रल्हाद पाटील, संदीप चौधरी, ज्ञानदेव वाघोदे यांच्यातर्फे अन्नदान केले जाणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहूण तापीतीर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.