पाचोऱ्यात पेट्रोल, डिझेल दर वाढी विरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन- तहसिलदारांना दिले निवेदन

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पेट्रोल आणि डिझेल च्या वाढलेल्या दरांच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने जोरदार धरणे आंदोलन दि. १५ रोजी दुपारी १ वाजता पाचोरा तहसील कार्यालया समोर करण्यात आले.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहे पेट्रोल ने तर नव्वदी पार केली आहे. या दरवाढी मुळे सर्व सामान्य जनमाणसांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. दुसरीकडे महागाई वाढतच आहे. इंधन दरवाढीसोबतच महागाई वाढत  आहे. या प्रकाराकडे केंद्र शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.

म्हणून केंद्र शासनाच्या विरोधात जण आक्रोश तयार झाला आहे. हा जणआक्रोश केंद्र शासना प्रर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने पाचोरा  तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने  दि. १५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पाचोरा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासना विरुध्द जोरदार घोषणा मुळे तहसिल कार्यालय आवार दणानुन गेला होता. याप्रसंगी उपस्थितांनी तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, मा. जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, सुमित किशोर पाटील, सुधाकर महाजन, नगरसेवक बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, अॅड. राजेंद्र परदेशी, जितेंद्र पेंढारकर, संदिपराजे पाटील, गजानन पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सौरभ चेडे, विजय भोई, सुष्मा पाटील, मंदा पाटील, उर्मिला शेळके, स्मिता बारावकर, कल्पना पाटील, अरुणा पिंगळे, रंजना आमले, संतोष हटकर सह शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.