शॉक लागल्याने मुलगा गंभीर जखमी

0

जळगाव | मशिदीच्या छतावर लोंबकळणाऱ्या अतिउच्च दाबाच्या विद्युत तारांचा शॉक लागून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता घडली. या तारांचा शॉक लागल्यामुळे गतवर्षी दोन मुलांचा मृत्यू झाला होता.

साबीर शकील खाटीक (वय १४, रा.दत्तनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. साबीर हा परिसरातील अलमन्नान मस्जीदच्या छतावर कामानिमित्त गेला होता. या मस्जीदच्या छतापासून सुमारे ३ ते ४ फुट अंतरावर अतीउच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत. तारांना स्पर्श झाल्यामुळे शॉक लागुन साबीर गंभीर जखमी झाला. मशिददमध्ये असलेल्या नागरीकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने साबीर याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक खराब असल्यामुळे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.