शेतकर्‍यांचा अधिकार्‍यांना घेराव

0

चोपडा :- तालुक्यातील घुमावल फिडरवर विजेचा जास्त लोड  असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त शेतकऱयानी आज दुपारी महापारेषणच्या कार्यलयात जाऊन उपकार्यकारी अभियंता व सहायक अभियंता याना घेराव घालून दोन तास कार्यलयात ठिय्या मांडला होता.

यावेळी शेतकरी खूपच आक्रमक असताना आम्हला नियमित वीज मिळाली पाहिजे म्हणून उपकार्यकारी अभियंता एस एम गायकवाड व सहायक अभियंता नितीन चौधरी  जाब विचारून आम्हला तात्काळ वीज नियमित द्या आपण वरिष्टाशी बोला आणि आमचा प्रॉब्लेम दूर करा या मागणीसाठी खडगाव व तावसे खुर्द येथील पंचवीस ते तीस शेतकरयानीअधिकार्‍याना  माजी प स सदस्य डॉ चंद्रकांत बारेला याच्या नेतृत्वाखाली जाब विचारला होता.  यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी सागितले की वादळी वार्‍यात आमच्या भागात केळीचे मोठे  झाले आहे.वरून 45 डिग्री तापमानात आम्ही जेमतेम कापूस जगविताना मोठी कसरत करावी लागत असताना आमचे पीक हे वीज नियमित नसल्याने जळत आहेत.महावितरण चे अधिकारी आणि वायरमन याना शेतकर्‍याच्या काहीच घेणेदेणे नाही. वारंवार वीज पुरवठा खडीत होतो,कमी धाबाचा वीज पूरवठा होणे यामुळे शेतकरी नाकेनऊ आले आहेत.कापूस लागवड केली आहे,केळी जळत  भरपाई मिळावी अन्यथा वीज पुरवठा पूर्ण वेळेवर मिळावा यासाठी घुमावल व खडगाव येथील शेतकर्‍यांनी थेट महापारेशन च्या कार्यलयात ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस एम गायकवाड व सहायक अभियंता नितीन चौधरी याना घेराव घालून आपल्या समस्या बाबत जाब विचारला होता. दोन वायरमन बाबत केली लेखी तक्रार:- या समस्या बाबत निवेदन  असून त्या निवेदनात वायरमन विष्णू ईशी व अनिल कोथरकर हे दोन्ही वायरमन शेतकर्‍यांशी अरेरावीचे भाषा करतात त्याची बदली झाली पाहिजे.कार्यलयातील फोन लागत नाही.अशी लेखी निवेदन डॉ बारेला याच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. शेतकर्‍याचे नेतृत्व डॉ चंद्रकांत बारेला,यांनी केले यावेळी शेतकर्‍यांमध्ये ईश्वर सूर्यवंशी,अशोक पाटील, शेखर पाटील,मिलिंद पाटील, प्रशांत पाटील,स्वप्नील पाटील, निंबा पाटील,उज्वल पाटील, किशोर  पाटील,भूषण पाटील, प्रवीण पाटील, चंद्रकांत पाटील,योगेश पाटील, ज्येष्ठ पाटील, हिरामण पाटील, अविनाश पाटील, रितेश बावचे, जिजाबराव पाटील, सनी पाटील, अशोक पाटील, रविंद्र पाटील, अमृत पाटील, दत्तात्रय पाटील, हर्षल पाटील, अमोल पाटील, वैभव पाटील,जयप्रकाश पाटील,भगवान बावचे, सुरेश पाटील,आदी शेतकरी यावेळी कार्यलयात ठिय्या मांडून बसले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.