समांतर रस्त्याचे येत्या पंधरवाड्यात भूमिपूजन -खा. उन्मेष पाटील

0

जळगाव :- महापालिका एम एस ई बी नॅशनल हायवे यांनी आपसात येत्या आठ दिवसांत समन्वय साधून समांतर रस्त्याचे कामाला अंतिम रूप द्यायचे असून रस्त्याची गरज असताना व अरुंद रस्त्यामुळे नाहक निष्पाप लोकांचा बळी जातो आहे. आपण समन्वय साधत लवकर कामाला सुरुवात करा. येत्या पंधरवड्यात मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करावयाचे आहे. आपण हलगर्जीपणा केल्यास जनता तुमच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास मागे पुढे पाहणार नाही.असा दम आज खासदार उन्मेष पाटील यांनी समांतर रस्त्याचे कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा बैठकीत केला.

नियोजन भवनात आज दुपारी दोन वाजता 

नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील व रक्षाताई खडसे यांच्या सूचनेने आज जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी असलेल्या नियोजन हॉल मध्ये आज नॅशनल हायवे , महापालिका एम एस ई बी, कृषी, अमृत योजना, समांतर रस्त्याचे अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकार्‍यांच्या आढावा बैठक दुपारी दोन वाजता सुरू झाली. यावेळी आढावा बैठकीला खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे , तर शहराचे आमदार राजू मामा भोळे, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मैहस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बैठकीच्या नियोजना मागचा हेतू  विषद करीत केंद्र सरकारव राज्य सरकारच्या विविध योजनांच्या आपल्या विभागाचे काम अधिक जोमाने मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्ह्यातील दळणवळणास चालना मिळावी. जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यात सुरु असलेली राष्ट्रीय व राज्य महामार्गांची तसेच रेल्वेची कामे तातडीने पूर्ण करावी. अशा सुचना खासदार उन्मेश पाटील यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. जळगाव-चाळीसगाव, जळगाव-औरंगाबाद, जळगाव-धुळे, चाळीसगाव-नांदगाव या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे. त्याचबरोबर जळगाव शहरातून जाण्यार्‍या राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी महानगरपालिका व महावितरण कंपनीने इलेक्ट्रीक पोल, पिण्याचे पाण्याची व सांडपाण्याची पाईप लाईन शिफ्टींगचे नियोजन लवकरात लवकर करावे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळावी. याकरीता पुरातत्व विभागाकडे असलेल्या जिल्ह्यातील 11 वास्तूंचे संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करावा. याठिकाणी पर्यटकांना द्यावाच्या मुलभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. जळगाव शहरात सुरु असलेल्या अमृत पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच चाळीसगाव – औरंगाबाद रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करण्याची सुचनाही खासदार पाटील यांनी केली.

त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात रेल्वेच्या जळगाव-मनमाड तिसरी रेल्वे लाईन, जळगाव-भुसावळ तिसरी व चौथी लाईनची कामे सुरु आहे. तसेच जामनेर-पहूर शटल सेवा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. तसेच भुसावळ, कजगाव व शिवाजीनगर येथे रेल्वे उ्डडाणपूल उभारणत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.