धुळ्याच्या विशाल गवळीचा चोपड्यात खून

0

आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

चोपडा :- सकाळी नऊ वाजेच्या अगोदर धरणगाव रस्त्यालगतच्या हतनुर कालव्याच्या पाटचारीवर रिक्षा मध्ये धुळे येथील रहिवासी विशाल गवळी (33) याचा रुमालाने गळा आवरुन व डोक्यावर दगड मारुन खुन करण्यात आला. खुन करून आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (28) रा.बारीवाडा चोपडा हा स्वतः शहर पोलिस स्टेशनला येऊन ममी खुन करुन आलो आहेफ असे सांगत स्वतः ला पोलिसांच्या  स्वाधीन केले आहे.

पोलिसांनी त्याला लागलीच अटक केली आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, 2012 मध्ये विशाल गवळीने त्याच्या मित्राच्या सहकार्याने आरोपी वैभव गवळीचा मामा सदाशिव गवळी(धुळे) यांच्या अगांवर अँसिड फेकून धुळ्यात खुन केला होता. मामाचा खुन विशालने केला म्हणून वैभवच्या मनात गेल्या 7 वर्षापासुन खुपच राग होता. वैभव गवळी याच्यावर अगोदरच शहर पोलिसात दुसर्‍या गुन्हयात 307 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. तसेच एवढे दिवस तो धुळ्याला विशाल गवळी याच्याकडेच राहत होता. मामाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दि.10 जुन रोजी विशालची रिक्षा भाड्याने करून दोघेही चोपड्याला आले. येथे आल्यावर मतु माझ्या मामाचा खुन केला आहे. म्हणून मी तुझा आज मर्डर करणारफ असे सांगून रिक्षा क्र.एम एच 18 ए पी 0597 यात विशाल गवळीचा रुमालाने गळा आवरुन व डोक्यात दगड मारुन खुन केला. त्यानंतर आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी हा स्वतः पोलिसांना शरण आला व मी खून केल्याचे सांगितले.

सदर घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल व प्रभारी पो. नि. भिमराव नंदुरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विशाल गवळीचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. देवकर सिदाप्पा गवळी (63) रा. धुळे यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिसात वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी(चोपडा)याच्या विरुद्ध 302 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो. नि. भिमराव नंदुरकर करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.