शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे भङगाव तहसिलदारांना निवेदन

0

भङगाव;- ;- शेत मालाला भाव मिळावा, बोंङअळीचे अनुदान तात्काळ मिळणेबाबत, शेतरस्त्यांचे कामे व शेत रस्ते नदी, नाले आदि ठिकाणी फरशी बसविणे. आदि शेतकर्यांच्या मागणीचे निवेदन शेतकरी संघटना भङगाव तालुका मार्फत राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फङणवीस, पंतप्रधान , भङगाव तहसिलदार सी. एम. वाघ आदिंना निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कपिशीसह धान्य ज्वारी, बाजरी, मका, उङीद, मुग, तुर, गहु, हरभरा आदि पिकांना योग्य भाव मिळावा.व वेळेवर खरेदी करावी. शासनाने चुकीच्या पद्धतीने कापसाची खरेदी केलेली आहे. शेतकर्यांनी माल व्यापार्यांना४८०० रुपये प्रति क्किंटल जवळपास मोजला गेल्यावर भाव वाढवला. मग शेतकरी कसा कर्जबाजाली होणार नाही? सरकार जर असे काम करत आहे म्हणुनशेतकरी बँकेचे कर्ज भरु शकत नाही. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. शेतकर्यांना स्वातंञ्याची गरज आहे. व्यापारी स्वातंञ्य तंञज्ञानाचे स्वातंञ्य आवश्यक संरचना प्रक्रीया उदयोगांना चालना दिल्यासव घटनेने घुसमटलेले परीशिष्ट ९ मधील शेतकरी विरोधी शेती विरोधी कायदे रदद केल्यास भारतातील शेतकरी जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करु शकतो. व कर्जमुक्त होउ शकतो.तरी शासनाने कपाशी, ज्वारी, मका, तुर, उङीद, मुग, गहु, हरभरा आदि शेतमालाला योग्य भाव दयावा शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लावावा. असेही निवेदनात नमुद केले आहे. तसेच बोंङअळीचे पैसे शेतकर्यांच्या बँक खात्यात त्वरीत जमा करावे. तालुक्याला काही पैसे मिळाले आहेत.सध्या पेरणीचा मोसम आहे.त्याकरीता पैशांची गरज आहे.असेही निवेदनात नमुद केले आहे.या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, शहरअध्यक्ष भगवान चौधरी, शहर उपाध्यक्ष मनोज परदेशी, सदस्य अरुण पाटील, सुभाष न्हावी, बाबुराव पाटील, विलास देशमुख, गोविंद नरवाङे,काशीनाथ वरवाङे, कन्हैयालाल महाजन, प्रकाश राठोङ आदिंच्या सहया आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.