शिवसेना शहरप्रमुखाच्या घरात धाडसी चोरी ! १२ ते १५ लाखांचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव :- येथील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या घरातून चोरट्यांनी १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. तसेच कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांचे घरही चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी गल्लीतील कुत्र्यांना गुंगीचे पदार्थ दिली असल्याची बाबही समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद रोडलगतच्या प्रभात गल्लीत घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

श्यामलाल कुमावत यांचे शेजारीच तीन घरे आहेत. यापैकी एका घरातील चोरट्यांनी कपाटामधील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान,  सकाळी सर्वप्रथम कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांच्याकडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर अन्य काही घरांच्या कड्या बाहेरुन लावल्याचे आढळून आले. कुत्रेही गुंगीत असल्याचे दिसून आले. थोड्या वेळात श्यामलाल कुमावत यांचेही घर चोरट्यांनी फोडल्याचे दिसले. घटनास्थळाळी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही व पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.