कर्नाटकात कुमारस्वामी सरकारला धक्का : ११ आमदारांचा राजीनामा

0

बेंगळूरू:-  कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असताना जेडीएस-काँग्रेसच्या एकूण ११ आमदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या ३ आमदारांचा समावेश आहे.  या वृत्ताला स्वतः राज्यपाल रमेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकारकडे काठावर बहुमत उरलं असून त्यांचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधल्या ११ आमदारांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.