शिवरे येथील रंजना पाटील यांची सरपंचपदी हॅट्रिक

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवरे दिगर ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी एकजूट दाखवत निवडणूक बिनविरोध करून पुन्हा एकदा रंजना सुनील पाटील यांच्या कामकाजावर विश्वास दाखवत त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली सरपंचपदाची हॅट्रिक साधणाऱ्या त्या तालुक्यातील एकमेव महिला सरपंच झाले आहेत.

यावेळी उपसरपंचपदी लटकन पाटील यांची निवड करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्योती प्रभाकर पाटील उषाबाई संभाजी पाटील कमलबाई अशा सुरेश बागुल रमेश भटकर पाटील विजय दामू पाटील जिभाऊ भीमराव सरदार हे उपस्थित होते यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच सदस्यांना एका विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील पोलीस पाटील तुकाराम पाटील तलाठी महेंद्र पाटील निवडणूक निर्णय अधिकारी श्री मटकरी ग्रामसेवक अनिल मोती राडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी सरपंच रंजना पाटील यांच्या कार्याचा गौरव करून ग्रामस्थांनी निवडणुकीला फाटा देत तंटे दूर ठेवून गावाच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.