शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त्त जळगांव जिल्हयातील ३५० गावांमध्ये बियाणे वाटप

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

६ जुन रोजी पाचोरा तालुक्यातील मौजे पुनगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त्त जळगांव जिल्हांत ३५० गावांमध्ये बियाणे वाटप ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून मोहिमे अंतर्गत पाचोरा तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना, महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेअंतर्गत प्रात्याक्षीक बियाणे वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगांव लोकसभा ग्रामीणचे खासदार उन्मेश पाटील होते. अध्यक्षीय भाषणात उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना खा. उन्मेष पाटील केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहीती दिली. भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पिक विमा व हवामान मापक यंत्रा बाबत उपस्थीतांना मार्गदर्शन केले, तसेच तालुका कृषि अधिकारी पाचोरा आर. एन. जाधव यांनी कापुस उत्पादकता वाढ व ईतर कृषि विभागाच्या योजनांची माहीती उपस्थीतांना करुन दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव यांनी केले. त्यांनी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व स्मार्ट योजनेची सविस्तर माहीती उपस्थीतांना दिली. कार्यक्रमाकरीता मंडळ कृषि अधिकारी के. एन. घोंगडे, कृषि पर्यवेक्षक यु. आर. जाधव, कृषि सहाय्यक संगीता पाटील, समुह सहाय्यक प्रदीप मराठे, पुनगांव चे सरपंचपती प्रल्हाद गुजर, उपसरपंच अनिल पाटील, प्रगतशील शेतकरी चिंतामण पाटील व ग्राम कृषि संजीवनी समितीचे सदस्य व गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.