शिक्षकांना निवडणूकीत प्रचाराचा अधिकार- सुधिर तायडे

0

भुसावळ दि.31 –
आचारसंहिता व शिक्षक या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन झाले. अधिनियम 1981 कलम 42 नुसार खासगी अनुदानीत, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना राजकीय पक्षांचा उघड प्रचार व प्रसार करता येतो त्याबाबत त्यांच्यावर कोणीही कार्यवाही करू शकत नाही. याबद्द्ल शिक्षण विभागाकडे देखील शिक्षक सेनेकडून निवेदन दिले जाईल तसेच लवकरच अनुदानाच्या प्रश्नाबाबत तोडगा निघणार असल्याची माहिती येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रादेशिक सचिव सुधीर तायडे यांनी दिली.
याबद्दल सेना भवन, दादर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मुंबई विभागाची शिक्षक सभा
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व राज्यमंत्री अल्पसंख्यांक आयोग ज.मो. अभ्यंकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर सभेत, आचारसंहिता व शिक्षक या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन झाले. अधिनियम 1981 कलम 42
नुसार खासगी अनुदानीत, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना राजकीय पक्षांचा उघड प्रचार व प्रसार करता येतो त्याबाबत त्यांच्यावर कोणीही कार्यवाही करू शकत नाही.
याबद्द्ल शिक्षण विभागाकडे देखील शिक्षक सेनेकडून निवेदन दिले जाईल तसेच लवकरच अनुदानाच्या प्रश्नाबाबत तोडगा निघेल असे तत्त्वता 8 मार्चच्या बैठकीत शिक्षण विभागाने मान्य केले आहे,तसेच इयत्ता 10 वी आणि 12 वी केंद्रप्रमुख, नियमक, परीक्षक ह्यांना निवडणूक ड्युटी देण्या बाबतचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांना भेटुन 10 वी आणि 12 वी च्या शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लावू नये याबाबतचे निवेदन देण्याचे ठरले.
सदर प्रसंगी मुंबईतील 200 हुन अधिक शिक्षक उपस्थित होते.
सभेला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले
या सभेस मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण, राज्य समन्वयक नितीन चौधरी,सरचिटणीस दिनेश गायकवाड, उतरतमुंबई अध्यक्ष भट्ट सर, उपाध्यक्ष व सेकंडरी स्कूल एम्प्लॉइस कॉ ऑप क्रेडिट सोसायटी चे संचालक राज बोराटे सर, उर्दू प्रमुख इल्यास शेख, उपाध्यक्ष थोरवे आदी उपस्थित असल्याचे सुधीर तायडे यांनी कळविले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.