जळगांवात विद्यमान खासदारांसह आमदारांची बंडखोरी कुणाच्या पथ्यावर

0

भाजपाला आघाडीसह बंडाळीला तोंड द्यावे लागणार ः खरे आवाहन गड राखण्याचेच

राजकीय वार्तापत्र

जळगांव.दि.31-
सतराव्या लोकसभेसाठी जिल्हयात भाजप आणि राष्ट्रवादीने सुरूवातीसच एकेक उमेदवार जाहिर करून दुसर्‍या जागेसाठी उत्सुकता वाढविली होती. जिल्हयाच्या पुर्व भागात आजी माजी खासदार तर पश्चिमेकडे आजी माजी आमदारात महायुती व आघाडी अशी लेवा व मराठा अशा जातीय समिकरण किंवा धृवीकरणारने खरी रंगत जिल्हा वासीयांना पहायला मिळणार आहे. दोनही भागात आजी माजी हे दिग्गज मुरब्बी राजकारणी समोरासमोर आहेत. त्यातच जळगांव लोकसभा मतदार संघात खरी लढत भाजपा महायुती व आघाडी अशी दुरंगी लढत रंगणार असे चित्र सुरूवातीपासून होते. परंतु भाजपातर्फे आ.स्मिता वाघ यांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने जळगांव लोकसभा मतदार संघात विद्यमान खा.ए.टी.पाटील, अपक्ष आ.शिरीष चौधरी हे देखिल उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चौरंगी लढत होउन होणारी बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडणार हे चित्र माघारी नंतरच स्पष्ट होईल.
यावेळी मात्र जळगांव लोकसभा मतदार संघात महायुती व आघाडीच्या आजी माजी आमदारांमधे चुरस तर आहेच सोबतीला कदाचित त्यांच्यात विद्यमान खा. ए.टी.पाटील यांच्यासह अमळनेरचे आ.शिरीष चौधरी हे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे. आ. शिरीष चौधरी हे जिल्हयात अपक्ष उमेदवारीव्दारे अमळनेर विधानसभा क्षेत्रातुन निवडून आलेले आहेत. शिवाय मुख्यमंत्री फडणवीसांना नेहमीच पाठींब्याची भुमिका दिलेली आहेे. एकुणच यावेळी लोकसभेसाठी भाजपा उमेदवाराला मराठा आघाडीसह बहुजन बंडाळीला देखिल तोंड द्यावे लागणार असून गड राखण्याचे खरे आवाहन ठरणार आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघात मात्र आजी व माजी तेही लेवा पाटीदार अशी दुरंगी लढत आहे. यात डॉ. उल्हास पाटीन यांनी केवळ 13 महिने अल्पावधी कालीन अटलबिहारी बाजपायी सरकारमधे विरोधी पक्षातील खासदार तर रक्षा खडसे या विद्यमान खासदार असून माजी महसूल तथा आ. एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्यातील देखिल लढत तुल्यबळ अशीच आहे.
पूर्व खान्देश जळगांव तर पश्मिममधे धुळे जिल्हा असे दोन भागात खान्देश विभागलेला होता. त्यात जळगांव लेवा पाटील व एरंडोल तसेच धुळे व नंदुरबार मतदार संघात अहिराणी बोलीभाषा असलेला मराठा मतदार संघ थेट पश्मिम खान्देशात देखिल आहे. हे चारही मतदार संघ पुर्वीपासून जे.टी.महाजन, मधुकरराव चौधरी, विजय नवल पाटील, चुडामण आनंदा पाटील, डॉ.रोहिदास पाटील, माणिकराव गावित यांच्या नावाने परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ल्याचे शिलेंदार म्हणून ओळखला जात होते. मध्यंतरी उत्तमराव पाटील, ब्रिजलाल पाटील, गुणवंतराव सरोदे या जनता व भाजपाच्या खासदारांनी काही काळ मतदार संघ कॉग्रेसकडून हस्तगत केला होता तदनंतर एम. के.पाटील, ए.टी.पाटील, वाय.जी.महाजन, हरीभाउ जावळे व रक्षा खडसे यांनी तो कायम आजतागायत राखून ठेवला. मध्यंतरी केवळ 18 महिन्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अपवादात्क स्थितीत जळगांव मधे पाय रोवण्याचा प्रयत्न केला तो असफल ठरला आहे. तदनंतर जळगांव व रावेर असे 2009 मधे नविन मतदार संघ अस्तीत्वात आले. तर याउलट सुमारे दोन ते तीन लाखांचे वर मताधिक्य घेत जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघात दोनही ठिकाणी भाजपाचे खासदार निवडून येवून बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे.
रावेर लोकसभा मतदार संघात यावेळी सुमारे दोन पंचवार्षिकनंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा लेवा विरूध्द लेवा अशी राजकीय वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. लोकसभेची उमेदवारी ही वैचारीक रणनिती असते. यात जनहिताचा व्यापक विचार महत्वाचा मानला जातो. यामुळे जातीवर आधारित समीकरणे ही नेहमीच यशस्वी होतीलच असे नसते. राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर लोकसभा मतदार संघात दोन पंचवार्षिक पासून लेवा पाटीदार विरोधी मतांची एकजुट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो विफल झाला. यावेळी देखिल सुरूवातीपासूनच काँग्रेसला हट्टाने थोपवून धरले होते. उमेदवारांची चाचपणी सुरू होती. अरूण गुजराथी, संतोष चौधरी, अ‍ॅड. रविंद्र पाटील यांचेसह अगदी नवखा चेहरा श्रीराम पाटील परंतु यातील सर्वानीच येथून माघार घेवून नकार दिला दिल्याने शेवटी नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेसने उदारपणाचा आव आणून काँग्रेसच्या झोळीत हे दान टाकले आहे. यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा एकाच समाजातील मान्यवरांमध्ये सामना होणार आहे. गत 2007 सालच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हरीभाऊ जावळे व डॉ. अर्जुन भंगाळे यांच्यानंतर पुन्हा एकदा लेवा पाटीदार समाजातीलच आजी व माजी खासदार उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.