शासकीय वैद्यकिय महाविद्यालय समस्यांचे निवारण करा- राष्ट्रवादी काँग्रेस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

 जळगाव :-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव व मोहाडी येथील सामान्य रुग्णालयात रुग्णावर होत असलेल्या उपचाराबाबत व सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून त्यांच्या आरोग्यास वेळीच उपचार व सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. या दोन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असून उपलब्ध डॉक्टर शासकीय सेवेला प्राधान्य न देता त्यांच्या मालकीच्या खाजगी दवाखान्यात जास्त वेळ देतात. मोहाडी येथील रुग्णालयात आवश्यक असलेला स्टॉफ नर्स,कंपाऊंडर, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा तज्ज्ञ आदि पुरेसा प्रमाणात नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात लॅबोरेटरी असतांना देखील विविध शारिरीक चाचण्याकरिता रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याने त्याची रुग्णांना आर्थिक झळ पोहचते.

रुगणालयातर्फे देण्यात आलेल्या मक्तेदाराकडील सुरक्षा रक्षक हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा करीत असतात व योग्य ती माहिती देण्यास टाळाटाळ तसेच रात्रपाळीस ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक हे महाप्राशन केलेले असल्याच्या तक्रारी रुग्ण व नातेवाईक करीत आहेत. यासोबतच इतरही अनेक समस्या येथे असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याने शासकीय

रुग्णालयात उपचार घेण्यास रुग्ण मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करतात. तरी रुग्णांना सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याकामी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने अधिष्ठाना निवेदन देण्यात आले. यापुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समस्यांचे निराकरण न झाल्यास  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगर, जळगांव (जिल्हा) यांचेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी,सुनील भैया माळी सरचिटणीस, भगवान सोनवणे उपाध्यक्ष, विषाल देशमुख सरचिटणीस, अमोल कोल्हे उपाध्यक्ष ,सुशील शिंदे माजी सरचिटणीस, अखिल पाटील उपाध्यक्ष, संजय हरणे कार्यकारणी सदस्य यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.