शांततेचे आवाहन करत पोलीस प्रशासनाचा रुट मार्च

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील मुख्य भागातून रुट मार्च काढुन शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी शहर पोलीस स्टेशन मलकापूर येथे आज उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी त्रिपुरा राज्य तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या दंगली संदर्भाने मलकापुर शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी या करिता शहरातील मुख्य मार्गावरुन रूट मार्च कढण्यात आला आहे.

रूट मार्चमध्ये एस आर पी जालना गट क्रं. 3 चे 24 अंमलदार, आरसीबी पथक क्रं 2 चे 11 अंमलदार व पोस्ट मलकापूर शहर येथील 3 अधिकारी व 15 अंमलदार हजर होते. रूट मार्च हा 1.05 वाजता पोलीस स्टेशन मलकापूर येथुन सुरू होऊन शहरातील तहसील चौक, चारखंबा चौक, सूर्यमुखी हनुमान मंदिर वल्ली, चौक गांधी, निमवाडी चौक, चांडक चौक, गाडगे बाबा चौक, हनुमान चौक,तहसिल चौक मार्गे 13.45 वा. पोस्ट मलकापूर शहर येथे समाप्त झाला. यावेळी शहरातील नागरिकांनी अफवावर  विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.