एकाच तलाठीकडे तीन सजेच्या कार्यभार; कागदपात्रांसाठी ग्रामस्थांची भटकंती

0

मनवेल ता.यावल, लोकशाही  न्युज नेटवर्क 

मनवेल, शिरसाड येथील तलाठी सजेला तलाठी नसल्यामुळे येथील नागरीकांना विविध कागदपत्रे व दाखले घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मनवेल व शिरसाड येथील तलाठी यांची बदली झाल्याने येथील सजेच्या कार्यभार साकळी येथील तलाठीकडे देण्यात आला आहे.

साकळी येथील तलाठी सजेचे मोठे गाव आहे.  तर मनवेल सजेच्या चार गावे तर शिरसाड असा तीन सजेच्या  पदभार एकाच तलाठीकडे असल्यामुळे नागरीकांना विविध  कागदपत्रे घेऊन भटकंती करावी लागत आहे.

तलाठी कार्यलय पडले ओस

मनवेल व शिरसाड येथील तलाठी  पद रीक्त असल्यामुळे कार्यलय ओस पडले आहे. ज्या तलाठीकडे अतिरिक्त पदभार आहे ते सजेकडे फिरूनही पहात नसल्यामुळे कार्यलय ओस पडले आहे.

सजेचे कोतवाल कार्यलयात बसून ग्रामस्थांना विविध कागदपत्रे तयार करुन देतात व सह्या करीता ग्रामस्थांना मात्र भटकंती करावी लागत असल्यामुळे नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.