शहापुर येथील अवैध दारुची भट्टी उध्वस्त

0

जामनेर | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शहापुर येथे अवैध दारुची भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे . सध्या देशात कोरोना विषाणुच्या पाश्र्वभुमीवर तालुक्यात शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु असुन पोलीस प्रशासन मेहनत घेत असल्याचे चित्र दिसत आहे . शहरासह खेडयापर्यंत तालुकावासीय काटेकोर पणे आदेशाचे पालन करीत आहे . कोरोना विषाणु पासुन बचावा साठी ऐकमेकांपासुन अंतर ठेवा . नाकाला व तोंडाला शिंकतांना रुमाल बांधला गेला पाहिजे गर्दी करू नका गर्दीत जाणे टाळा असा संदेश शासनाच्या वतीने देण्यात आला .कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने संपूर्ण देशात”लॉक-डाउन”जाहीर केला असून या आजाराचा प्रसार वाढू नये यासाठी बियर बार,देशी दारू विक्रीची दुकाने, तसेच गावठी दारूच्या हटभट्ट्या,व विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.बियर बार,देशी दारू विक्रीची दुकाने बंद झाल्याने गावठी दारू विक्रेत्यांनी या संधीचा फायदा उठवला असल्याचे चित्र दिसून येत आहे.जामनेर तालुक्यातील चित्र देखील काही वेगळे नाहीये.जामनेर पोलीस प्रशासन आपला बंदोबस्तात व्यस्त असल्याचे पाहून शहरासह तालुक्यातील हातभट्टी व्यावसायिकांनी आपले उखळ पांढरे”करत असल्याचे चित्र दिसून येत होते. जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक-प्रताप इंगळे यांनी या अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कारवाईचा धडाका लावला आहे.काल दि-2 रोजी निर्भिड पत्रकार संघाची  टिम हि तालुका भरात वृत्त संकलन करीत असतांना शहापुर येथे अवैध दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाली धरणाच्या साठवण भागात शेताच्या बंधारावर एक भट्टी  निदर्शनास आली . निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल इंगळे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना या बाबत माहिती दिली . व शहापुर येथील पोलीस पाटील यांना सुद्धा कळविण्यात आले . पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवुन दारुची भट्टी उध्वस्त करण्याचे आदेश दिले.कारवाई प्रसंगी पोलीस कर्मचारी राहुल पाटील, निलेश घुगे, तुषार पाटील, विठ्ठल काकडे, विलास चव्हाण, हेड .काँ सोनवणे,तसेच निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन तायडे, अनिल शिरसाठ , अविनाश सपकाळे, सुनिल सुरवाडे, पोलीस पाटील आनंदा सुशीर, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.