क्रिकेट खेळणं पडलं महागात, पोलिसांनी काढली ‘विकेट’

0

चाळीसगाव | प्रतिनिधी 

आज रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नि महावीर जाधव, पोलीस हवालदार गणेश पाटील,पोलिस अंमलदार संदीप पाटील, शरद पाटील, अमोल पाटील, रवींद्र पाटील, भूषण पाटील व इतर पथकासह चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आर. के. लाँन्स जवळील मोकळ्या जागेत 6 इसम क्रिकेट खेळण्यासाठी जमा झालेले मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव पोलीस स्टेशनला संचारबंदी, जमावबंदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खालील इसमांवर कारवाई करण्यात आली.

1) निलेश यवनाश शिरसाठ,  वय- 31 वर्षे , राहणार – शिवशक्ती नगर, चाळीसगाव. 2) अजय गुलाबराव करांकाळ वय- 27वर्षे , राहणार- शिवशक्ती नगर, चाळीसगाव ३) प्रदीप ज्ञानेश्वर पाटील. वय- 30 वर्षे , राहणार- शिवशक्ती नगर, चाळीसगाव 4) सोनू बापू आहिरे, वय- 20 वर्षे, राहणार- शिवशक्ती नगर, चाळीसगाव 5) रामेश्वर शांताराम चौधरी, वय- 43 वर्षे, राहणार-नारायणवाडी,चालीसगाव. 6) अक्षय चंदूलाल बच्छाव, वय- 26 वर्षे, राहणार- जुने विमानतळ, स्टेट बँक कॉलनी,चाळीसगाव, चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने घराबाहेर विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तरी काही तरुण नाहक घराबाहेर फिरताना दिसल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नसल्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकुरवाड,साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मयुरजी भांमरे, पोलीस उपनिरीक्षक श्री महावीर जाधव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.