पाचोरा पिपल्स बॅंकेतर्फे गोर – गरिब कुटुंबियांना किराणा वाटप

0

पाचोरा | प्रतिनिधी

जगभरात गेल्या महिनाभरापासून कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटतांना दिसत आहे. यावर उपाय योजना म्हणुन गेल्या १२ दिवसांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही लाॅकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे रोजंदारी व हात मजुरी करणाऱ्या गोर – गरिबांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपली असतांनाच येथील दि. पाचोरा पिपल्स को – आॅफ बॅंक ही गोर – गरिब नागरिकांसाठी एक मदतीचा हात म्हणुन पुढे आली आहे. दि. ३ रोजी दुपारी २ वाजता शहरातील बाजोरिया नगर भागातील राध्येशाम अग्रवाल यांचे गोडावुनपासुन वाटपाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्र्वर कातकडे, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर,  पिपल्स बॅंकेचे संचालक प्रा. भागवत महालपुरे, प्रकाश एकनाथ पाटील, अॅड. अविनाश भालेराव, विकास वाघ, देवेंद्र कोटेचा, पिपल्स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एल. परदेशी, व्यवस्थापक पी. डी. पाटील, आर. एस. पाटील उपस्थित होते. ५ किलो गव्हाचे पिठ, ३ किलो तांदुळ, १ किलो तुर दाळ, १ किलो साखर, १ किलो तेल, १ मिठ पुडी, २०० ग्रॅम मिरची पावडर, २०० ग्रॅम हळद, २०० ग्रॅम चहा पावडर याप्रमाणे ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही अशा २ हजार ५०० गोर – गरिब कुटुंबियांना किराणा माल देण्यात येत आहे. बाजोरिया नगर येथील राध्येशाम अग्रवाल यांचे गोडावुनमध्ये सर्व किराणा मालाची पॅकींग करुन तेथुनच शहरात वाटप करण्यात येत आहे. याकामी सेवा भावी गृपचे मोहन अग्रवाल, सिताराम अग्रवाल, बबलु संघवी, माधवराव सिनकर, किशोर अग्रवाल, राजेश मोर, अंकित अग्रवाल, राजेश पटवारी, पप्पु मोर, योगेश अग्रवाल सह पिपल्स बॅंकेचे कर्मचारी सुरेश वारुळे, रहेमान तडवी, अतुल गेंदोडिया हे परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.