शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

0

जळगाव । वाघूर धरण ते पंप हाऊस पर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बसविणे व पंप हाऊसवरील दोन पंप बसविण्याचे काम आजपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. मंगळवारी होणारा पाणीपुरवठा दि.15 रोजी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

शहराला वाघुर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. ऐन उन्हाळ्यात जळगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान महापालिकेकडून वाघूर धरण ते पंप हाऊसपर्यंतच्या २१५० मिमी.च्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिमी व्यासाचे ६ स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पंप हाऊसमध्ये दोन नवीन ५०० हॉर्सपॉवरचे पंप बसविण्याचे काम आज (दि. १४) सकाळी ७ वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. या कामाला एकूण ३० तास किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लगणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आज (दि. १४) होणारा पाणीपुरवठा उद्या, बुधवारी (दि. १५), बुधवारी होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १६) रोजी, तर गुरुवारी (दि. १६) होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (दि. १७) होणार असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

बुधवारी या भागात होणार पाणीपुरवठा

वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, डी.एस.पी.बायपास- तांबापुरा, शामाफायर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, श्रीधरनगर, श्री रुख्मिणीनगर, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, महाबळ, मोहननगर, आनंदनगर, नागेश्वर कॉलनी, मेहरुण पहिला दिवस-अक्सा नगर, रामेश्वर कॉलनी, गणेशपुरी, मलिकनगर, रामनगर, नित्यानंदनगर टाकीवरील मोहननगर, नेहरूनगर, गिरणा टाकी उंच टाकी- राका पार्क, वाघनगर, लक्ष्मीनगर, सुयोग कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, शिवकॉलनी गट नं.59, 60, शिक्षक कॉलनी, विद्युत कॉलनी.

गुरुवारी या भागात होणार पाणीपुरवठा

खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसर, जाकिर हुसेन कॉलनी, डीएसपी टाकी-इंद्रप्रस्थनगर, यशवंतनगर, श्रद्धा कॉलनी, टेलिफोन नगर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर परिसर, ऑफीसर क्लब टाकी परिसर, उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, मेहरुण परिसर, मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथ नगर, मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर, सतगुरु नगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर आदी भागांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.