आजपासून पॅसेंजर गाड्या रद्द

0

भुसावळ । मध्य रेल्वे भुसावळ विभागामध्ये बडनेरा-भुसावळ सेक्शन दरम्यान पुलाच्या पुनः बांधणीचे काम करण्यासाठी विशेष इंजीनिरिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे त्याकरता काही पॅसेंजर (सवारी) गाड्या आजपासून (दि.13) पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहे.

रद्द गाड्यांमध्ये – गाडी क्र. 51183 डाउन भुसावल- नरखेर पॅसेंजर, गाडी क्र. 51184 अप नरखेर भुसावल पॅसेंजर, गाडी क्र. 51152 अप नरखेड -नवी अमरावती पॅसेंजर, गाडी क्र. 51151 डाउन नवी अमरावती – नरखेर पॅसेंजर, गाडी क्र. 51197 डाउन भुसावळ – वर्धा पॅसेंजर, गाडी क्र. 51198 अप वर्धा भुसावळ पॅसेंजर या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.