…अन बस नेली थेट पोलीस ठाण्यात

0

जळगाव- जळगाव-जामनेर बसमध्ये चढत असतांना जामनेर येथील महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना नवीन बसस्थानक येथे सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. तिकीट काढण्यासाठी पिशवीत हात टाकला असता पर्स चोरीला गेल्याची बाब लक्ष्यात आली. चोरटा हा बसमध्ये असावा या संशयाने महिलेने बस थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणली. मात्र चोरटा न सापडल्याने प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

रुपाली अवकाळे (रा.जामनेर) या बँकेतील काम आटोपून एका तरुणीसह नवीन बसस्थानकावर पोहोचल्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमएच.२० बीएल ३३६२ क्रमाकांची जळगाव-जामनेर बस फलाटावर आल्यानंतर त्या बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढतांना गर्दी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीला ब्लेड मारून मोबईल व अडीच हजार रुपये, एटीएम कार्ड, पॅन कार्ड असलेली पर्स चोरून नेली. बस बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर आकाशवाणी चौकात महिला वाहक या तिकीट काढण्यासाठी अवकाळे यांच्याजवळ आल्या. अवकाळे यांनी पिशवीत हात टाकला असता त्यांना पर्स व मोबईल गायब झालेला दिसला. तर पिशवी देखील फाटलेली दिसून आली. चोरटा हा बस मध्ये असावा त्यामुळे अवकाळे यांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली. पोलिसांनी तपासणी केली असता कुणाकडे काही मिळून आले नाही, नंतर रुपाली अवकाळे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.