शरद पवार बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?

0

राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून दरम्यान, शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पवार शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसत आहेत वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेताच्या बांधावर गेल्याने विरोधकांकडून टीका होत असतानाच शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधवार जाणार नाहीत तर काय बंगल्यात बसून राहतील काय?, असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला आहे

शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार हे शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निवडून येतात. पवार हे शेतकरी कुटुंबातूनच आलेले आहेत. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ते शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे आजवरचे सर्वात कमजोर मुख्यमंत्री आहेत असं सांगतानाच सरकारच्या तिजोरीत खणखणाट असताना ते शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? असा सवालही राणे यांनी केला होता. त्यावर ‘जे पेन्शनमध्ये गेले, त्यांचे काय टेन्शन घ्यायचे’, अशा शब्दात पाटील यांनी राणेंची खिल्ली उडवली.

Leave A Reply

Your email address will not be published.