बंद घर टार्गेट ; घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास

0

भुसावळ (प्रतिनिधी)–  शहरातील मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगर भागात  अज्ञात चोरट्यांने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७हजार  रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी नगरमध्ये मुन्ना तेली यांच्या घराजवळअजीज ठेकेदार यांचे मालकीचे घरात फिर्यादी इकरामुल हक मोनिस खान वास्तव्य करीत होते

दिनांक १६ मार्च २०२०  रोजी रात्री १० वाजेच्या सुमारापासून ते १९ ऑक्टोबर  रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून घरातील एल.ई.डी टीव्ही,चांदीच्या वाट्या,चांदीचे तोरडया,सोन्याच्या अंगठ्या,नाकातील फुली,कानातील सोन्याच्या रिंग असे एकूण ३७ हजार रुपये  किंमतीच्या वस्तू कोणीतरी अज्ञात चोरट्याने  चोरून नेल्याची फिर्याद दिल्यावरुन  बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना तेजस पारीसकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.