भाजपवाल्यांना ना.यशोमती ठाकूर यांच्या राजीनामा मागण्याचा नैतीक अधिकार नाही

0

खामगांव:– देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्रींवर भ्रष्टाचाराचे आरोप व अनेक नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असतांना महिला व बालविकास मंत्री ना.श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांनी करणे ही बाब गैर असून एका कोर्टाने निर्णय दिला म्हणजे तो अंतीम होत नाही. वरीष्ट कोर्टात न्याय मिळेल असा आशावाद मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केला असून महारश्ट्रातील संपूर्ण काॅंग्रेस श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या पाठीशी आहे अशी भूमीका सानंदा यांनी मांडली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रींवर न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर व सकृत दर्षनी भ्रष्टाचार दिसत असतांना भाजपच्या मंत्रींनी राजीनामे का दिले नाही असा प्रतिप्रष्न सानंदा यांनी भाजपाला विचार असून भाजपवाल्यांना त्यांचा राजीनामा मागण्याचा नैतीक अधिकार नाही.

अमरावती जिल्हयातील सर्व विभाग  भाजपमुक्त केल्यामुळे व महाविकास आघाडीतील महिला व बालविकास मंत्री झाल्यामुळे त्या विभागाला न्याय दिल्यामुळे राजकीय द्वेशापोटी श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या विरोधात भाजपने बदनामीची मोहिम सुरु केल्याचे सानंदा म्हणाले. न्यायालयाने त्यांना 3 महिन्याची शिक्षा ठोठावली असली तरी उच्च न्यायालयात दाद मागण्याची त्यांना मुभा आहे. म्हणून उच्च न्यायालयात ताई निर्दोश होतील व राजकारणापोटी आरोप करणारे तोंडघशी पडतील असा विश्वास सानंदा यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.