समुद्र किनाऱ्यावर मोदींची स्वच्छता मोहीम

0

महाबलीपूरमः पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून देशभरात नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छता मोहीम राबवण्यसाठी ते स्वतः रस्त्यावर उतरताना अनेकदा दिसले आहेत. आज पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर कचरा दिसताच मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली. मोदी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करीत सार्वजनिक स्थळावर सर्वांनी कचरा करू नये, स्वच्छता राखल्यास आरोग्य चांगले राहते, असे लोकांना आवाहन केले. महाबलीपूरमधील समूद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा एका पिशवीत भरून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवताना मोदी दिसले आहेत. हा व्हिडिओ स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.