#व्हिडीओ : बोदवडमधील नम्र फायनान्स बँकेत जबरी चोरी; चोरटा ‘सीसीटीव्ही’त कैद

0

बोदवड :- येथील रविवारी मध्यरात्री नम्र फायनान्स बँकेच्या ऑफिसमध्ये चोरट्याने प्रवेश करून बँक मॅनेजरच्या रुममधील लोखंडी लॉकरमधील बारा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे तोंडाला रुमाल बांधलेला असून हातात लोखंडी रॉड घेऊन तो दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जामठी रोडवरील जयाबाई नामदेव ठोंबरे यांच्या मालकीच्या ठोंबरे दुध डेअरीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या नम्र फायनान्स बँकेच्या ऑफिसमध्ये रविवारी मध्यरात्री तीन ते साडेतीन च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँक मॅनेजरच्या रुममधील लोखंडी लॉकर रॉडच्या सहाय्याने फोडून १२,०८,२५२ रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत पोबारा केला. अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे तोंडाला रुमाल बांधलेला असून हातात लोखंडी रॉड घेऊन तो दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पाहणी करतेवेळी पोलीस निरीक्षक सुनील खरे,पोलिस नाईक गोपाल गव्हाळे, श्री.च्हाण, पोलीस कॉन्स्टेबल संदिप वानखेडे, राहूल जोहरे उपस्थित होते.

यासह घटनास्थळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पथक,श्वानपथक,फिंगरप्रिंट पथकाने पाहणी केली आहे. याबाबत बोलताना लवकरच चोरट्यांचा शोध घेतला जाणार असल्याची प्रतिक्रिया उपविभाग पोलिस अधिकारी सुरेश जाधव यांनी ‘लोकशाही’शी बोलतांना दिली.

गुन्ह्याचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक सुनील खरे करीत असून ऐन सणासुदीच्या तोंडावर झालेली ही जबरी चोरी पोलिसांसमोर एक मोठं आव्हान ठरत असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.