भुसावळ – पुणे हुतात्मा एक्स्प्रेस मार्गात बदल

0

भुसावळ (प्रतिनिधी)  मध्य रेल्वे पुणे विभागात तांत्रिक कामामुळे हुतात्मा एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.

ट्रेन क्रमांक – 11025 अप भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही ट्रेन दिनांक  15 ते  20 ऑक्टोबर 2019 दरम्यान  मनमाड – दौंड मार्गावरुन येईल व पुण्याला जाईल. तसेच  ट्रेन क्रमांक – 11026 डाऊन पुणे – भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही ट्रेन 15 ते 20.ऑक्टोबर 2019 दरम्यान   दौंड, मनमाड मार्गाने भुसावळकडे पोहोचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.