#व्हिडीओ# पोलिसांवरील दगडफेक ; मन सुन्न करणार हा व्हीडिओ पहाच…

0

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला सुरू असलेल्या विरोधाने देशात अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतले आहे.  या हिंसक आंदोलनांमुळे कर्नाटकातल्या मंगळुरूत दोन, लखनऊमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला.  दरम्यान, गुजरातमध्ये पोलिसांवर दगफेक करीत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात आंदोलकांनी पोलिसांना घेरल्याचं पाहायला मिळतंय. जमावानं पोलिसांना घेरून त्यांच्यावर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले.

अहमदाबादमधील शाह आलम परिसरात ही घटना घडली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसक आंदोलनानंतर अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनीही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी 32 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिंसक आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. या घटनेत 19 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गुरूवारी गुजरात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पालनपुरमध्येही हजारो जण रस्त्यावर उतरल्याने रस्ता बंद झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर परिस्थिती चिघळली आणि काही आंदोलकांनी पोलिसांच्या गाडी उलटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अहमदाबाद पालनपुर महामार्ग बंद करण्यात आला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.