शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड ; सेन्सेक्स ४१ हजाराच्या वर

0

मुंबई :  शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. गुंतवणूकदारांच्या या उत्साही खरेदीमुळे सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात १२५ अंकांची वृद्धी साधून ४१८०४ हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही ३० अंकांची कमाई करत १२२९०चा स्तर गाठला. ऊर्जा, आयटी व वाहन उद्योगांच्या समभागांना शुक्रवारी प्रचंड मागणी आहे. गेले तीन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी स्वत:चाच उच्चांक मोडीत काढत आहेत.

सेन्सेक्समधील वृद्धीमुळे सर्व प्रमुख समभागांच्या मूल्यात मागील तीन सत्रांत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकारे मूल्य वाढल्यानंतर गुंतवणूकदारांकडून सहसा नफेखोरीचा पवित्रा घेतला जातो. मात्र गुंतवणूकदार अजूनही समभागखरेदी करण्याच्या मूडमध्ये आहेत. येस बँक, हिरो मोटोकाॅर्प, एसबीआय, भारती इन्फ्राटेल, टाटा स्टील, कोल इंडीया, टाटा मोटर्स या समभागांना सर्वाधिक मागणी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.