चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार काका-पुतणे ठार

0

जळगाव । जैन पाईप कंपनी समोर भरधाव चारचाकी वाहनाने काका व पुतण्या यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. हे दोघे बांभोरी येथे मयत झालेल्या नातेवाइकांकडे जात होते. महेश पोपट तायडे (वय-३२) व पुतण्या जयवंत उर्फ कृष्णा रातीलाल तायडे (वय १४) असे मृतांचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की,  बांभोरी येथे महेश यांच्या बहीणीचे सासरे वारल्याने त्यांच्याकडे काका-पुतण्या हे दोघे दुचाकीवरून जात होते. यावेळी जैन पाईप कंपनी जवळ समोरून येणार्‍या अज्ञात चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे.  या घटनेबाबत पारधी आऊट पोस्ट येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.