किनवट येथे पट्याच्या नावावर झाडांची कत्तल

0

किनवट (प्रतिनिधी ) : तालुक्यातील शेतीतील तसेच जंगल निहाय भागात मोठ्या प्रमाणात सागवान प्रजातीसह विवीध प्रजातीच्या वृक्षाची पट्याच्या नावावर कत्तल होत असुन त्यासाठी लागणाऱ्या वृक्ष तोडीच्या परवानगीचे नियम व निकष वनाचे रक्षण करणाऱ्या वनविभागाकडून पायदळी तुडविले जात आहे. तर जेव्हा पासुन वृक्षतोड परवानगीचे आधिकार महसुल विभागाकडून वन विभागाकडे आले.तेव्हा पासुन शेतातील धुऱ्यावरील जंगलनिहाय शेतात असलेले वेगवेगळ्या जातीच्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यासाठी परवानगी देऊन चिरी- मिरी घेवून पर्यावरणाचा ऱ्हास करत जंगालाचे वाळवंटात रूपांतर करत रक्षकच भक्षक बनले असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट तालुका हा वनसंपत्तीने नटलेला तालुका म्हणुन सबंध मराठवाडयात सुपरिचीत असुन या संपत्ती मधुन मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सागवान झाडांची पटयाच्या नावावर अवैध तोड होत असल्याने बहुतांश जंगलक्षेत्राचे वाळवंटात रुपांतर होत असल्याचे भयावह वास्तव चित्र पहावयास मिळत आहे.

शेतातील, व इतर ठिकाणी असलेल्या वृक्ष तोडीचा परवानगीचा अर्ज शेतकऱ्याकडून स्विकारल्या जात होता. उल्लेखीत असलेला जायमोक्यावर महसुल विभागाचे कर्मचारी, आधिकारी पाहणी करुण शेती पिकाला नुकसान होत असल्यास वा नैसर्गीक आपत्तीने झाडे कमकुवत व केव्हाही पडण्याची शक्यता असल्यास काही अवश्यक असलेल्या निकषावर तोड परवानगी दिली जात असे. अशा प्रकारे महसुल विभागाकडून वृक्षाची जोपासना केली जात होती. तर अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर अनेक कारवाया केल्या असल्याचा येथील पुर्व इतिहास सुद्धा आहे.

किनवट /माहुर तालुक्यात सहा वनपरिक्षेत्र कार्यालय कार्यरत असुन सदर कार्यालया कडुन सर्व वृक्षतोडीचे नियम व निकष धाब्यावर बसवून विना सर्वेक्षण सरकारी गायरान, भोगवटादार वर्ग २ अशा जमिनीतील मागेल त्याला तोड परवानगी देण्याचा घाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी किसन खंदारे यांनी घातला आहे. “तेरी भी चुप मेरी भी चुप” चा प्रकार चालविला असल्याने कुंपनच शेत खात असल्याची प्रचीती येथे निर्माण झाली आहे. तर विना परवानगी व पट्टातोड परवानगीचा नावावर अवैध वृक्षतोड होत असल्याच्या अनेक तक्रारीवर कारवाई करण्या ऐवजी अवैध वृक्षतोड केल्या नंतर त्या मालाला वाहतुक पास देण्यासाठी थातुर -मातुर दंडाची कारवाई करूण अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यापारी लाकुड माफीयांना एका प्रकारे अभय दिल्या जात असल्याचे वनप्रेमींकडून बोलल्या जात आहे.

तालुक्यात जंगल क्षेत्रामध्ये अमाप वृक्षतोड झाल्यामुळे त्याचे दुष्परीणाम या परिसरातील सर्वांना भोगावे लागणार हे मात्र वास्तव आहे.पट्याच्या सदराखाली अवैध वृक्षतोड प्रकरणी केवळ वनविभागातील भ्रष्ट वनपरिक्षेत्र आधिकारी, कर्मचारी यांनाच जवाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध वनाधिनियमा नूसार कठोरात कठोर कार्यवाहीची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.