व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर; म्हणाले.. ‘सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे.”

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मंगळवारी  राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू चांगलेच भावूक झाले आहेत. व्यंकय्या नायडू यांना विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

राज्यसभेत मंगळवारी झालेल्या गदारोळवर बोलताना भावूक झालेल्या व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, ‘काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले तेव्हा या सभागृहाचे पावित्र्य नष्ट करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही’. दरम्यान राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू कारवाई करणार आहेत. याच मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पियूष गोयल आणि इतर भाजपा खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.

 

राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले आणि आसनाच्या दिशेने नियमपुस्तिका फेकली. तसेच जय जवान जय किसानच्या घोषणादेखील दिल्या. यावेळी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.