वैद्यकिय महाविद्यालयात अधिष्ठातापदाचे धिंडवडे !

0

जळगाव येथील सरकारी वैद्यकिय महाविद्यालयाला किस्सा खुर्ची का जणू रोग लागलेला आहे. यापूर्वीसुध्दा ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तत्कालिन अधिष्ठाता डॉ.खैरे पदावर असतांना एका विभाग प्रमुख डॉक्टरांनी अधिष्ठात्याच्या कार्यालयात जावून मीच अधिष्ठाता म्हणून खुर्चीवर बसून ताबा घेतला होता. हे प्रकरण त्यावेळी गाजले होते. हे प्रकरण हे प्रकरण त्यावेळी घडले असतांना आता वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांची नुकतीच बदली झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले हाते. त्यांचा अतिरिक्त पदभार नागपूर येथून जळगावल बदली झालेले डॉ.फू.ल.पाटील यांनी घ्यावा असे त्यांच्या आदेशावर नमूद करण्यात आल्याचे डॉ.फू.ल.पाटील सांगतात. डॉ.फू.ल.पाटील हे नागपूर येथील शरीरशास्त्र विभाग म्हणून कार्यरत असतांना दिनांक 26 ऑगस्ट रोजी जळगावात शरीरशास्त्र विभागाच्या रिक्त प्राध्यापकाच्या जागी बदली झाली. डॉ.फू.ल.पाटील 7 सप्टेंबरला जळगाव वैद्यकिय महाविद्यालयात रूजू झाले. तथापि. शरीरशास्त्र विभागात प्राध्यापकाची जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना त्या विभागात रूजू करून घेण्यास विद्यमान अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी नकार दिला. त्यामुळे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे डॉ.रामानंद यांचे म्हणणे. 7 सप्टेंबरपासून जळगावात आलेले डॉ.मिलींद फूल पाटील यांचा गेल्या आठ दिवसात संयम सुटला. काल सोमवार दि.13 सप्टेंबर रोजी ते वैद्यकिय महाविद्यालयात जाऊन अधिष्ठाता पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि सूत्रे स्विकारली असे जाहीर केले. दरम्यान, विद्यमान अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद हे आपल्या निवासस्थानीच बसून होते. त्यानंतर किस्सा खुर्चीच्या नाट्य वैद्यकिय महाविद्यालयात चांगलेच रंगले डॉ.मिलींद फूलपाटील म्हणतात. मी अधिष्ठाता पदाची सूत्रे स्विकारली आणि डॉ.जयप्रकाश रामानंद म्हणतात मी वरिष्ठाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागविली आहे. यात कोण खरे कोण खोटे चा वादात पडल्यास सर्व सामान्यांना देणे घेणे नाही परंतु अधिष्ठाता पदासारख्या वरिष्ठ पदासंदर्भात जो तमाशा चाललेला आहे. त्यामुळे शासनाचे प्रशासनाचे मात्र धिंडवडे निघाले आहे. एवढे मात्र निश्चित

कोरोनाच्या दोन लाटा झाल्या. आता संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिसरी लाट घातक आहे की नाही याची कल्पना नाही परंतु त्यांचे नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सजग असली पाहिजे ही अपेक्षा असतांना वैद्यकिय महाविद्यालयात अधिष्ठातासारख्या प्रमुखांनी हा चालविलेला पोरखेळ थांबवावा, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे निघणे योग्य नाही. अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे फावते. ते सुध्दा आपल्या बॉसच्या थाटातच वावरायला लागतात. अशावेळी प्रमुख म्हणून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जो वचक हवा तो राहत नाही. वैद्यकिय शिक्षण संचालनालयातर्फे अशा होणाऱ्या घटनांच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी जळगाव जिल्हा कोरोना हॉटस्पॉट बनला असतांना, कोरोनामुळे मृत्यूचे दर वाढले असतांना कोरोनावर योग्य उपचार करून तो नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी तत्कालिन वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.खैरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांचेतील मतभेद चव्हाट्यावर आले. त्याचा परिणाम जिल्हा रुग्णालय हे पूर्णपणे कोविड उपचारासाठी घोषित केले असतांना एका वृध्द महिलेचा टॉयलेटमध्ये मृत्यू झाला आणि दोन दिवस त्यांचा थांगपता लागला नव्हता हे प्रकरण महाराष्ट्रात नव्हे देशात गाजले. सांगण्याचे तात्पर्य प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा संपूर्ण शासकीय आरोग्य यंत्रणा बदनाम होते. याचेसाधे भान त्यांना राहत नाही. वैद्यकिय शिक्षण संचालनालयातर्फे कडक कारवाई का केली जात नाही. याचा शोध घेतला तर डॉक्टरांनी कमतरता असल्याचे सांगून बाजी मारून नेली जाते. परंतु या सर्व प्रकरणात स्थानिक जिल्हा प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेतृत्व अर्थात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्री यांची भूमिका महत्वाची ठरते.

शेवटी स्थानिक म्हणून त्यांची काही जबाबदारी येते. केवळ कानावर हात ठेवून नामनिराळे राहणे चांगले नाही. स्थानिक प्रशासन याबाबत योग्य भूमिका बजावत नसेल तर विभागीय प्रशासनाने त्यावर वचक असला पाहिजे. परंतु सध्या सर्वत्र आनंदी आनंद गडे अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच अशाप्रकारे किस्सा खुर्चीच्या घटना वारंवार घडत राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.