विशाल देवकर यांच्या उमेदवारीने जळगाव ग्रामीणमध्ये रंगत वाढली

0

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादीने धरणगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अगदी त्यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतू माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनीही राष्ट्रवादीसह अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे जळगाव ग्रामीणमधील राजकारणाला अचानक कलाटणी मिळाली आहे.

या संदर्भात अधिक असे की, जळगाव ग्रामीण मतदार संघातून पक्षाने धरणगावच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अगदी त्यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतू अचानक दुपारी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी राष्ट्रवादीसह अपक्ष अर्ज दाखल केला. देवकर परिवाराने धक्कातंत्र अवलंबविल्यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील राजकारणाला अचानक कलाटणी मिळाली आहे. निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतल्यानंतर रात्रीतून नेमके असे काय घडले? याचीच जोरदार चर्चा मतदार संघात सुरु आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळपर्यंत गुलाबराव देवकर यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होणार आहे. देवकर यांना जामीन मिळाल्यास विशाल देवकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवायची अशी त्यांची रणनीती आहे. दरम्यान, यावेळी धरणगाव पालिकेचे माजी उपाध्यक्ष दीपक वाघमारे, धरणगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी,माजी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे धरणगाव शहराध्यक्ष निलेश चौधरी,मोहन पाटील, एन.डी.पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, वैशाली बोरोले, सीमा नेहते, डॉ. नितीन पाटील, बाळू आबा, देवेंद्र देसले, धिरज पाटील, अरविंद देवरे, नारायण चौधरी, सागर वाजपाई, अजय महाजन, अमोल सोनार, लक्ष्मण पाटील, रंगराव पाटील, विजय पाटील, किरण नन्नवरे, राहुल पाटील, अनिल पाटील, मधुकर पाटील, नवल पाटील यांच्यासह धरणगाव व जळगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे भाजपचे नेते पी.सी.पाटील यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे आणि जळगाव कृउबाचे माजी उपसभापती लकी टेलर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकंदरीत पी.सी. पाटील यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध एकच उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे ते विशाल देवकर यांना देखील गळाला लावण्याचा प्रयत्न करतील,असे बोलले जात आहे. थोडक्यात विशाल देवकर यांच्या उमेदवारी अर्जामुळे जळगाव ग्रामीणमधील राजकारणाला अचानक धक्कादायकरित्या कलाटणी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.